मी नास्तिक का आहे
या प्रश्नाचे उत्तर ‘मी आस्तिक नाही म्हणून’ या चार शब्दांत देणे शक्य आहे हा विचार बाजूला सारला तरी मी जन्मतःच नास्तिक नव्हतो. कोणतीही व्यक्ती तिला थोडेफार कळायला लागल्यावर तिच्या अवतीभवतीच्या वातावरणानुसार, उदा. घरातील संस्कार, शाळेतील शिक्षण, ती व्यक्ती वावरत असलेल्या समाजाचा सर्वसाधारण विचार, इत्यादि कारणांमुळे आस्तिक किंवा नास्तिक बनत असते. संपादकांनी सुचविलेला विषय फक्त ईश्वराचे …